Headlines

जगदंबच्या तालावर थिरकले उत्तरप्रदेशवासी!

 

मलकापूर:- मलकापूर येथील श्री. जगदंब ढोल पथक हे 11-14 झाशीच्या दौऱ्यावर गेले होते. 12 आणि 13 तारखेला झाशीच्या कार्यक्रमात मानवंदना देऊन पथक आता परतीच्या प्रवासाला निघाले असून, 12 आणि 13 या दोन दिवसाच्या प्रदर्शनात जगदंब ढोल पथकाने गुरसराय येथे आयोजित 1008 श्री. नेमिनाथ भगवान जिनबिम्ब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव मध्ये तडाखेदार वादन केले असून, आयोजक आणि प्रेक्षक पथकाचे वादन पाहून मंत्रमुग्ध झाले, इतकचं नाही तर पथकाची शिस्तप्रिय आणि तडाखेबंद जबरदस्त वादन पाहून आनंद व्यक्त केला, तसेच आम्ही आजपर्यंत इतकं जबरदस्त आणि शिस्तप्रिय वादन आम्ही कधी पाहिला नव्हता असं म्हणत त्यांनी वादनाचा गौरव केला. भारतातून अनेक ठिकाणाहून अनेक लोक व मोठे मोठे मान्यवर त्या ठिकाणावर आले होते, त्यांनी पथकाच्या शिस्तीचे आणि वादनाचे कौतुक केले तसेच पथकाचा विशेष सत्कार त्याठिकाणी करण्यात आला. जगदंब ढोल पथकाच्या तालावर झांसी वासियांनी देखील ठेका धरला. पथकाने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने झांसिवासियांवर एक विशेष छाप सोडली. इतकचं नाही तर महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती महाराष्ट्राबाहेर गाजवून आणि संस्कृतीचे झेंडे उत्तरप्रदेशात रोवून पथकाने कराच गौरवास्पद काम केले आहे. याच कारणाने पथक येत्या काळात देखील अजून एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सादरीकरण करतांना दिसू शकते.

चौकट

*झांसी तो सिर्फ झाकी हैं..!*
पथकाने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर झांसी येथील कार्यक्रमात भारतातून अनेक ठिकाणावरून लोक आले होते पथकाचे प्रदर्शन पाहिल्यानंतर पथकाला अनेक ठिकाणावरून निमंत्रण आले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचा समावेश असून, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, आदी राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे पथकातील वादकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, झांसी तो अभी झाकी हैं, अभी तो बडा धमाका बाकी हैं अशी भावना पथकातील सदस्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!