Headlines

मलकापूर मतदानात शेवटच्या तासात तब्बल उछाल! 74.04% टक्क्यांवर मतदानाची घोडदौड

 

मलकापूर:- मलकापूर नगरपालिका निवडणुकीत यंदा मतदारांनी बदलाची उमेद दाखवत मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली. दिवसाभरात शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मतदान होत असताना, शेवटच्या तासात मतदारांनी अक्षरशः धडाकाच उडवला. चार वाजेपर्यंत केवळ 56% मतदान झाले होते; परंतु संध्याकाळी अवघ्या एका ते दीड तासांत तब्बल 18.04% मतदानाची भर पडली आणि एकूण मतदानाचा आकडा सरळ 74.04% वर पोहोचला. नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अनेक केंद्रांवर तर कामकाजाच्या शेवटीही मतदारांची रांग कमी होण्याचे नाव घेत नव्हती. विशेष म्हणजे, सर्व मतदान केंद्रांवर नियोजित वेळेपर्यंत संध्याकाळ पर्यंत मतदान सुरूच होते. या मतदानाच्या मोठ्या टक्केवारीमुळे निकालात उलटफेराची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आता मतमोजणीपर्यंत सर्वांचे लक्ष ताणून धरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!