थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यास मारहाण, पिता-पुत्रावर गुन्हा

 

देऊळगावराजा :- थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला मारहाण करण्यात आली ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दत्तनगरमध्ये घडली.
देऊळगावराजा येथील महावितरण कंपनीचे सहायक अभियंता रवींद्र किटे व त्यांचे सहकारी दत्तनगरमध्ये थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेले होते. तेथे रामेश्वर पवार व त्यांच्या मोठ्या मुलाने वीज जोडणी खंडित केल्याचा राग मनात धरून किटे यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रामेश्वर पवार व त्यांचा मोठा मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे हे
करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!