मलकापूर :- सद्ध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. शेत जमिनी खरडून गेल्या,उभे पीक सडले,वाहून गेले.गावेच्या गावे पुराखली बुडाले.पूरग्रस्त लोकांना खायला अन्न पाणी नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडचा घास ऐन दिवाळीत हिरवल्या गेला.हे भयावह परिस्थीत लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड शिवश्री मनोज आखरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर २९ सप्टेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या आमदार/खासदार यांच्या घरासमोर संबळ, टाळ मृदंग वाजवत आंदोलन करावे असे आदेश दिले.याच आदेशाचे पालन करत मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरा समोर संबळ, टाळ मृदंगाच्या गजरात भव्य आंदोलन करण्यात आले व आमदार साहेबांचे प्रतिनिधी श्री गावंडे व उपविभागीय अधिकारी श्री संतोष शिंदे साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.ज्यामधे नमूद आहे की तत्काळ शेतकरी कर्जमाफी करा,पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा,पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा,ओला दुष्काळ जाहीर करा,सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दिवाळीच्या आत त्याला आर्थिक मदत द्या असे सदर निवेदनात नमूद आहे यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील,बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील,जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे,जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर,मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे,नांदुरा तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार,मलकापूर तालुका उपाध्यक्ष गणेश सोनवणे,मलकापूर तालुका कार्याध्यक्ष माधव रत्नपारखी,बेलाड शाखाध्याख गजानन संबारे,डॉ.हनुमान भगत, रामचंद्र संबारे,सुधाकर राजस,अभिषेक संबारे, गजानन जोगी,रवींद्र वनारे,श्रीकृष्ण मनस्कार,सुनील केणे व इतर उपस्थित होते.
