Headlines

ढोल-ताशांच्या गजरात लेझीम स्पर्धा; सावजी फैल ( प्रथम ) माता महाकाली नगर ( द्वितीय ) तर महाराणा मंडळ,गाडेगाव मोहल्ला ( तृतीय )

 

मलकापूर : – ( उमेश इटणारे ) दुर्गानगर येथील श्री नवदुर्गा लेझीम मंडळाच्या वतीने आज (२८ सप्टेंबर) रोजी लि. भो. चांडक विद्यालयाच्या मैदानावर भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक लेझीम खेळाला नवी उभारी मिळावी सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि शहरात पुन्हा एकदा सांस्कृतिक चैतन्य जागवावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ११ लेझीम पथकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रत्येक पथकात तब्बल ५० ते ६० खेळाडूंचा सहभाग होता. विशेष म्हणजे आयोजक मंडळाने स्वतः स्पर्धेत भाग न घेता इतर पथकांना संधी मिळावी याची काळजी घेतली. या स्पर्धेत यशवंत लेझीम पथक सावजी फैल यांनी प्रथम क्रमांक पटकावला व ३१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. द्वितीय क्रमांक माता महाकाली नगर लेझीम मंडळाने मिळवला (२१ हजार रुपये), तर तृतीय क्रमांक महाराणा क्रीडा मंडळ गाडेगाव मोहल्ला यांनी पटकावला (११ हजार रुपये) हा उपक्रम आमदार चैनसुख संचेती यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला असून त्यांच्या प्रेरणेतून शहरातील सांस्कृतिक परंपरा पुन्हा उजाळली आहे. लेझीमच्या तालावर झुलणारे खेळाडू, प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट आणि विजेत्यांचा आनंद यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!