मलकापूर :- उमाळी (ता. मलकापूर) येथील रहिवासी राजेंद्र पुंजाजी पाखरे हे २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.राजेंद्र पाखरे कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले असून, त्यांची स्कुटी (क्रमांक एमएच-२८-बीएफ-७९१२) देखील गायब आहे. याबाबत त्यांच्या वडिलांनी, पुंजाजी गनपत पाखरे रा. उमाळी), २६ डिसेंबर रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सूर्यवंशी करीत आहेत.