मलकापूर:- मलकापूर तालुक्यातील वरखेड येथून एक संताप जनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वरखेड येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम मूर्तीची अज्ञात भामट्याने विटंबना केली ही घटना 27 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घडली असून 28 सप्टेंबरच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ग्राम वरखेड येथे श्रीराम लक्ष्मण सिता यांचे मंदीर असुन फीर्यादी हा मंदीरामध्ये झोपला होता सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शेतात गाइचे दुध काढण्यासाठी निघुन गेला. शेतातुन परत आल्यानंतर मीत्र विनोद तायडे यांच्यासह श्रीराम मंदीराचे ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी मंदीरामधे कोकीळाबाई तायडे हया मंदीराची साफसफाई करण्यासाठी आल्या असता त्यांना प्रभू श्रीराम, लक्ष्मण,सितामाता यांचे मुर्तीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाने तरी नाकावर तोंडावर, गालावर मारुन अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली. त्यामुळे गावातील लोकांच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी अक्षय अनिल तायडे वय 28 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध 298 बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.