Headlines

लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाचे तीन खेळाडू विभागीय स्तरावर

मलकापूर :- दिनांक 30 ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा अधिकारी ओजस धारपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली लीलाधर भोजराज चांडक विद्यालय येथे बुलढाणा जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग 2024-25 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन वीरसिंग दादा राजपूत तर चांडक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ जयंत राजूरकर सर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत साळुंखे सर प्रा.धीरज जी वैष्णव प्रा. डॉ . नितीन भुजबळ मलकापूर तालुका क्रीडा संयोजक दिनेश राठोड सर होते.

या स्पर्धेत 17 वर्षाखालील 19 वर्षाखालील तब्बल 76 स्पर्धक मुले मुली सहभागी झाल्या होत्या
या स्पर्धेत चांडक विद्यालयच्या तीन खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी करत आपले नाव विभागीय स्पर्धेसाठी नोंदवले सर्व यशस्वी खेळाडूंना संस्था संचालक मंडळ,शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक संघ व इतरेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत उंबरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप वैष्णव सर यांनी केले या जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून  रामा मेहसरे, थटार सर,जुमडे सर, वराडे सर,नवले सर,आकाश शिरकरे,विनय पाटील, राहुल बगाडे, , विकास सोखंडे यांनी काम पहिले
तर लोडर म्हणून अंश श्रीवास विनायक अत्तरकार प्रणव गीते मयूर ठोसर यांनी काम पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *