वृत्तसंस्था – महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे.
महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी
याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी
पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.