Headlines

मलकापूरच्या या परिसरात 144 कलम लागू..मलकापूरचे सभापती यांच्याविरुद्ध उद्या अविश्वास ठराव सभा..

मलकापूर (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरचे सभापती शिवचंद्र तायडे यांचेविरूध्द अविश्वास ठराव पारीत करण्याबाबत सदस्यांनी केलेल्या मागणी अनुषंगाने ३१ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार मलकापूर कार्यालयाचे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा कालावधीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच सभा निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पडावी याकरीता प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांनी कृउबास उपबाजार हद्दीपावेतो परिसरात जमाव करण्यास, वाहनांचा प्रवेश, अनधिकृत प्रवेश यावर तसेच ज्याद्वारे नियमांचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्याचे आदेश आज २९ मे रोजी जारी केले आहे.

जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडील आदेश क्र.कावि/स्थानि/कक्ष-९-३/१५१/२०२४, दि.२१.५.२०२४ नुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २३ (अ) (२) मधील तरतुदीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूरचे सभापती यांचे विरूध्द अविश्वास ठराव पारीत करणेबाबत केलेल्या मागणी पत्र दि.२१/५/२०२४ नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा कृउबास मलकापूर येथील कार्यालयाचे सभागृहामध्ये ३१ मे रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आलेली आहे. फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मलकापूर उपविभागातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार मलकापूर परिसराच्या हद्दीपावेतो विशेष सर्वसाधारण सभा कालावधीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच विशेष सर्वसाधारण सभा निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आचारसंहिता लागू असल्यामुळे विशेष सर्वसाधारण सभा कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यादृष्टीने केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार हद्दीपावेतो परिसरात जमाव करण्यास, वाहनाचा प्रवेश, अनधिकृत प्रवेश यावर तसेच ज्याद्वारे नियमाचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *