मलकापूर : शहरातील गौरीपुत्र नगरात यंदा पहिल्यांदाच श्री. गौरीपुत्र गणेश मंडळाच्या वतीने गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात बसवण्यात आला आहे. मंडळाने यावर्षी पुण्याच्या प्रसिध्द व श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात बाप्पाला प्रतिष्ठापना दिली आहे.
संस्थापक अध्यक्ष रितेश दहिभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून, गणेशोत्सव काळात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रम व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. यासंदर्भात रितेश दहिभाते यांनी “परिसरातील नागरिकांना एकत्र आणत सामाजिक ऐक्य आणि संस्कृती जोपासणे हाच आमचा उद्देश आहे,” असे विदर्भ लाईव्हशी बोलताना सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत नागरिकांना प्रबोधनासोबत मनोरंजनही मिळणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
दगडूशेठ हलवाईच्या रूपात गौरीपुत्र नगरात बाप्पा विराजमान
