नांदुरा:- (गोपाल पारधी) ८ ते १० वर्षांपूर्वी सर्वत्र वादग्रस्त श्री गणेश मूर्ती बाजारात आल्या होत्या.ज्यामधे मूर्तीचे मुंडके महापुरुषांचे व धड गणपतीचे,यामधे छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांचे अशा प्रकारच्या ह्या मुर्त्या होत्या.याला संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने प्रखर विरोध केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा वादग्रस्त मुर्त्यांवर बंदी आली होती.याचे कारण की आपल्याकडे गणपती बुडवयाची प्रथा आहे.पण महापुरुषांचे आपण विसर्जन करत नाही.सोबतच गणपतीचे मुंडके कापून व महापुरुषांचे धड लावणे हे विकृत आहे.यामुळे महापुरुषांचा अवमान होऊन समाजभावणा दुखावल्या जातात. म्हणून आम्ही विरोध करून ह्या मुर्त्यांवर बंदी आणली होती. स्वतः पोलीस प्रशासनान आमच्या सोबत फिरून ठिकठिकाणी छापे मारत ह्या मुर्त्या जप्त करण्यात आल्या होत्या.यामुळे नुकसान होऊ नये म्हणून मुर्तीकारांनी अशा मुर्त्या बनविणे बंद केले होते.पण८ ते १० वर्षांच्या कालावधीनंतर काही मुर्तीकारांनी परत ही विकृत शक्कल लढवून गणपती व गणपतीच्या बाजूला छत्रपती शिवराय बसविले.वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांचा आणि गणपतीचा संबंध तो काय❓
शिवरायांनी गणपती बसविला किंव्हा त्याची पूजा केली असे इतिहासात कुठ नमूद नाही.शिवराय फक्त भवानी मातेला आणि महादेवाला पुजत.म्हणून गणपतीच्या मूर्तीत बळजबरीने शिवराय घुसविण्यामागे,विकृती करण्यामागे मुर्तिकरांचा खप व्हावा या उद्देशाने केलेली ही विकृती आहे. शेवटी विषय येतो तो विसर्जनाचा आणि प्रथे प्रमाणे गणपतीचे विसर्जन करणे ठीक आहे पण त्या सोबत आपण शिवरायांना ही पाण्यात फेकून त्यांचा अवमान करतो.अती उत्साहाच्या भरात आपण महापुरुषांचा अवमान करतो हेच विसरतो.ही बाब अत्यंत चुकीची असून अशा मूर्ती कलाकारांवर तात्काळ कारवाई करून ह्या मुर्त्या पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्याव्या व मूर्ती कलाकारांना सक्त ताकीद द्यावी की यानंतर गणपतीच्या मूर्तीत महापुरुष घुसवू नये.अन्यथा आम्ही प्रखर विरोध करू. प्रसंगी आक्रमक पवित्रा घेऊ.यानंतर जे दुष्परिणाम होतील यांची सर्वस्वी जवाबदारी पोलीस प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांना पाठविण्यात आले.निवेदनाची दखल घेत नांदुरा चे कर्तव्यदक्ष ठाणेदार शिवश्री विलास पाटील साहेब यांनी तत्काळ मूर्ती कलाकारांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत ते मूर्ति कलाकारांना अशा मूर्ती बनवू व विकू नये अशी सक्त ताकीद देणार आहेत.तसेच अशा मुर्त्या बसवून शिवरायांचा अवमान करू नका.वाटल्यास गणपती मंडळात बाजूला स्वतंत्र शिवरायांची मूर्ती ठेवावी पण एकत्रित मूर्ती नको असे आवाहन संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यवाहक अमर रमेश पाटील यांनी केले आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा कार्यवाहक अमर रमेश पाटील,नांदुरा तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे,तालुका उपाध्यक्ष सचिन बाठे,तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे,वाहतूक शाखा तालुकाध्यक्ष अमोल भगत,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,रुपेश पवार,अरुण सुरवाडे,दिलीप इंगळे,अशोक कोल्हे,विनायक धांडे,अभिषेक सोळंके,सोहम जवंजाळ,दीपक टहलानी,सोपान पाटील, व इतर संभाजी ब्रिगेड सदस्य उपस्थित होते