Headlines

दुर्गा वहिनी राष्ट्रधर्म संस्कृतीचे रक्षणासाठी कटिबद्ध आहे, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेश झापर्डे यांचे प्रतिपादन

मलकापूर:- श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या विविध आयामांच्या संदर्भात पात्रता, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमांमुळे बजरंग दलाला देशभरात मान्यता मिळाली होती. त्याच्या गतिशील योगदानाचा परिणाम म्हणून, देशभरातील नव-युवक विहिंपकडे आकर्षित झाले. देशाच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण बजरंग दलात सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे मुलीही विहिंपकडे आकर्षित झाल्या.सेवा,सुरक्षा, संस्कार आणि गतिमानतेची भावना जागृत करण्यासाठी तसेच त्यांच्याशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने, विहिंपने संवत २०४१ च्या अश्विन शुक्ल अष्टमी (दुर्गा-अष्टमी) रोजी दुर्गा वाहिनी या नावाने हिंदू युवतीची स्वतंत्र संघटना स्थापन केली. 15 ते 35 वर्षे वयोगटातील बहिणी दुर्गावाहिनीमध्ये सामील होऊ शकतात. दुर्गा वाहिनी ही हिंदू युवतीची संघटना आहे, जी राष्ट्र-धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि हिंदू समाजात सेवा, सुरक्षा आणि संस्कार हे ब्रीदवाक्य आहे.

असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेश झापर्डे यांनी मलकापूर येथे आयोजित दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी आयोजित सभेत केले.

मलकापूर येथे विश्व हिंदू परिषद द्वारे दुर्गा वाहिनीचा 21 दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिरा चा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेश झापर्डे, यांची उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक ज्ञानदेव पाटील, नगर सह संघचालक राजेश महाजन , विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री राजेंद्र सिंह राजपूत, विश्व हिंदू परिषद तालुकाप्रमुख संमती जैन, मातृ शक्ती प्रखंड संयोजिका नेहा ताई सदावर्ते हे लाभले होते. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री राजेंद्र सिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की दुर्गावाहिनीच्या संघटनात्मक विस्तारासाठी गेली अनेक वर्षे काम सुरू आहे. दुर्गा वाहिनीची संघटना आगामी काळात सर्व परिमाणात स्वतंत्रपणे उभी राहील,सर्व प्रांतात 2-3 दिवस ते 15-20 दिवस भगिनींसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. सर्व प्रादेशिक वर्गातील महिला विभाग आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती उत्साहवर्धक आहे. दुर्गा वाहिनी समाजात काम करताना सेवा, सुरक्षा आणि संस्कार यावर भर देते. दरम्यान मलकापूर शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आले. यामध्ये चौका चौकामध्ये मुलींनी प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता कुटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुक्ता टिकार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *