खामगाव : तालुक्यातील वाडी येथे वृध्दाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश वसंतराव सुर्यवंशी वय ३९ वर्षे रा. सप्तशृंगीनगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, त्यांच्या पत्नीने फोन करुन सांगितले की, तुमच्या वडिलांनी लोखंडी खिडकीचे ग्रीलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून मरण पावलेले दिसून आले.
या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी कलम १९४ बीएनएसनुसार मर्ग दाखल केला. पुढील तपास पोनिसा यांचे आदेशाने पोहेकॉ मनोहर गोरे यांचेकडे देण्यात आला. मृतकाचे पश्चात ३ मुली, मुलगा, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे.