कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला वीट मारून केले जखमी, युवका विरुद्ध गुन्हा! खामगाव येथील घटना

 

खामगाव:- कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याशी युवकाने वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर युवकाने अधिकाऱ्याला वीट मारून जखमी केले. याप्रकरणी तक्रारीवरून संशयित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिस स्टेशनआंतर्गत एएसआय अनिल जगन्नाथ भगत (५६) यांची निर्मल टर्निंग पॉइंटवर ड्यूटी लागलेली होती त्यावेळी भगत कर्तव्य बजावत असताना सतीफैलातील विशाल ऊर्फ धम्मा देवनारायण यादव (२४) हा तेथे आला व आरडा ओरड करू लागला. यावेळी एएसआय भगत यांनी त्याला हटकले असता, यादव याने शिवीगाळ करून वाद घातला, तसेच लोटपाट केली तसेच बाजूला पडलेली वीट मारून एएसआय भगत यांचे डोके फोडले. यात ते जखमी झाल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी एएसआय भगत यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!