Headlines

माणुसकीचा धर्म सोडून स्वतःच्या व्यवसायासाठी आरो कॅन धारकांन कडून 60 रुपय ते 80 रुपयांनी कॅनची विक्री; मलकापूरात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार

मलकापूर:- अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मलकापूर शहरासह तालुक्याला झोपडपले आहे. या वादळी वाऱ्याने शहरातील अनेक झाडे तुटून पडली आहे तर उभे विद्युत पोल सुद्धा अक्षरशा जमिनीपर्यंत झोपले आहे. यामुळे मलकापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून विद्युत पुरवठा ठप्प पडला आहे. विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने कडाक्याच्या उन्हाने लाहीलाही होत आहे. अश्यातच विद्युत पुरवठा नसल्याने आरो प्लांट धारक जनरेटर च्या साह्याने आरो प्लांट सुरू करून माणुसकीचा धर्म सोडून स्वतःच्या व्यवसायासाठी आरो कॅन 60 रुपय ते 80 रुपयांच्या बेभावाने विकून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार मलकापूर शहरात सुरू आहे. या कडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे अंत्यत गरजेचे आहे. तर दुसरी कडे माजी नगरसेवक सुहास चवरे यांनी त्यांच्या दुकान समोर उन्हाळा सुरू झाल्या पासून मुक्त मसध्ये आरो पाणी ठेऊन माणुसकीचा धर्म जपत आहे. दररोज त्या ठिकाणी 5 ते 6 कॅन पाणी लागायचे मात्र दोन दिवसा पासून तिथे 80 ते 90 कॅन लागत आहे.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शहरातील अनेक झाडे विद्युत पोल पडून जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शहरातील संपूर्ण विद्युत पुरवठा ठप्पा पडला होता. मात्र महावितरणचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याने ज्या ठिकाणी झाडे, विद्दुत पोल व्यवस्थित असतील त्या ठिकाणची तपासणी करून विद्दुत पुरवठा सुरळीत केला गेला आहे. याचाच फायदा घेत शहरातील आरो प्लांट धारक माणुसकीला काळिमा फासून स्वतःच्या व्यवसायासाठी नागरिकांनची मजबुरी बघून 15 ते 20 रुपयाला मिळणारी पाण्याची कॅन 60 ते 80 रुपयाला विकण्याचा प्रकार मलकापूर शहरात सुरू आहे. पाणी हे जीवन आहे असं म्हटल्या जाते मात्र शहरातील आरो प्लांट धारक याला व्यवसाय करून नागरिकांची लूट करीत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *