दुसरबीड :- खंडाळा येथील शेतकरी ज्ञानदेव सखाराम दराडे यांच्या गट नंबर २३० व२३२ मध्ये कपाशी पिकाची लागवड केलेली असून, त्या कपाशी पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी कुत्रा पाळला होता. २७ सप्टेंबर रोजी रात्री कुत्रा शेतात असतांना बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. हाल्यात बिबट्याने कुत्राला जागीच ठार केले. सकाळी शेत मालक शेताला चक्कर मारण्यासाठी गेले असता कुत्रा मृत अवस्थेत पडलेला दिसला. आजुबाजूला पाहिले असता कुत्रा व बिबट्या मध्ये झटापट होऊन जमिनीवर जागोजागी रक्त व मास पडलेले दिसले. २ दिवसापासून पाऊस पडत होता. त्यामुळे चिखलात बिबट्याच्या पायाचे पंजे शेत दिसले. त्यांनतर दराडे यांनी गावात ही माहिती दिली. गावातील युवकांनी विभागाला वन याची माहिती दिली असता वनरक्षक आरो यांनी घटनास्थळी येऊन पाहीले असता बिबट्याच्या पायाचे वन त्या ठिकाणी दिसले. तेथील पंचनामा करून वरिष्ठांना कळविल्याचे वनरक्षकांनी सांगितले आहे.एक महिन्या अगोदर याच शिवारात बकरीवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले होते. आता कुत्रा ठार केला. उद्या एखाद्या व्यक्तीवर जर हल्ला केला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न खंडाळा येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा शोध घेऊन याला तात्काळ जेर बंद करून दुसर्या ठिकाणी हलवावे. अशी मागणी बिबी, खंडाळा, किनगाव, चिखला येथील शेतकरी करीत आहे.