मलकापूर :- येथील कार्यालयांतर्गत तहसील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर फौजी ढाबा, कन्हैया हॉटेल यासह तीन अवैध बायोडिझेल पंपांवर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने आज, ७ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनेक अवैध बायोडिझेल पंपावर उशिरा का होईना आज कारवाई करुन आपले कर्तव्य बजावले असल्याचे दिसून आले या करवाईने अवैध बायोडिझेल पंपचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपांच्या संचालकांशी अर्थपूर्ण व्यवहार असलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई केल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.एकीकडे अवैध व्यवसायांना आशीर्वाद, तर दुसरीकडे थातूरमातूर कारवाई करणारे महसूल अधिकाऱ्यांचे धोरण चर्चेत आले आहे. मलकापूरमध्ये नांदुऱ्याप्रमाणे कारकिर्द गाजणार असल्याच्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज झालेल्या कारवाईस तहसीलदार राहुल तायडे, पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले, पाटील, जाधव, फाटे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.