Headlines

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त मलकापूर येथे ‘स्वच्छता अभियाना’चा उपक्रम

मलकापूर :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा, तालुका विधी सेवा समिती, मलकापूर, वकील संघ, मलकापूर आणि न्यायालयीन कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथील सचिव नितीन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार “राष्ट्रीय विधी सेवा दिना”चे औचित्य साधून रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील न्यायालयीन परिसरात भव्य स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. या अभियानात सहभागी झालेल्या प्रत्येक अधिकारी, वकील आणि कर्मचाऱ्याने न्यायालयीन परिसराचा कोपरा न कोपरा स्वच्छ करण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला.ज्यामुळे स्वच्छतेचा एक उत्कृष्ट संदेश देण्यात आला. या अभियानात तालुका विधी सेवा समिती, मलकापूरचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासह न्या. ए. एन. जयस्वाल, न्या. एस. एस. महाले आणि न्या. ए. यू. मोटे यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती.
यासोबतच सरकारी वकील व्ही. एम. बापट, वकील संघाचे माजी अध्यक्ष जी. डब्ल्यू. सोमण व इतर वकील संघाचे सदस्य ए. डी. तांदूळकर एन.सी. जाधव, हरिष रावळ, एस. सी. एदलाबादकर, जी. डी. पाटील एस. आर. तारकसे व इतर सदस्य, न्यायालयातील अधीक्षक एम.डी. जोशी, आर.बी. चव्हाण, सौ.एम. आर. खर्चे, सहाय्यक अधीक्षक एस. एस. महाजन, पी.एन. शिंदे, सौ आर. जी. कोल्हे, वाय. एन. नायसे, ए. पी. बेलुकर व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी हे सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त राबविलेल्या या संयुक्त स्वच्छता अभियानातून न्यायिक आणि प्रशासकीय घटकांनी सामूहिक जबाबदारीची भावना दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!