मलकापूरः अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या प्रकरणातील आरोपीस आज ९ डिसेंबर रोजी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिली.या प्रकरणाची माहिती अशी की, ७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर अवैध गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडून ८५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात कंटेनर चालक शहीद रहेमत (वय ३७, रा. मेवात, हरीयाणा) याला अटक करून विविध कलमानुसार मलकापूर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.न्यायालयाने आरोपीला प्रथम एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ९ डिसेंबर रोजी त्याची कोठडी संपल्यावर आरोपी शहीद रहेमत यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कोळासे हे करीत आहेत.