मेहकर : – नाशिकहून शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाला जाणाऱ्या खुळे कुटुंबीयांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर टोल क्रमांक २९१ जवळ गाडीचे टायर फुटल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
या अपघातात महेश खुळे (वय ४४) गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच दीपाली खुळे (वय ३८), शकुंतला खुळे (वय ६०) आणि धनश्री खुळे (वय १८) हे तिघे जखमी झाले आहेत.अपघातातील गाडी क्रमांक एम. एच. १५ ई एक्स ५१७४ ही मारुती अल्टो असून गाडीतील कुटुंबीय नाशिकहून शेगावला जात होते. अचानक टायर फुटल्याने समृद्धी महामार्गावर हा दुर्दैवी अपघात घडला.अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पुढील तपास सुरु आहे.
दर्शनाला जात असतांना समृद्धी महामार्गावर अपघात; टायर फुटल्याने कार पलटी, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी!
