खामगाव (जि. बुलढाणा) – शेगाव येथील विश्राम भवनासमोरील रस्त्याच्या बाजूला अवैधरित्या मटका खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या दिनेश यशवंत इंगळे (वय 43, रा. चिचोंडी, ता. शेगाव) याला 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शेगाव पोलिसांनी अटक केली.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून दिनेश इंगळेला मटक्यासाठी जमा केलेले 430 रुपये व साहित्यसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस हवालदार नामदेव वाघमारे यांनी शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 13(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेगावात मटका खेळविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, 430 रुपयांसह साहित्य जप्त!
