मलकापूर:- समाजातील युवकांनी सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कार्य केले तर देश विकसित होतो. ही सर्व शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारात आहे. म्हणून सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी युवकांनी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करावी असे आवाहन सप्तखंजेरी वादक युवा किर्तनकार ऋशिपाल महाराज यांनी केले. माता महाकली नगर मधील विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मिञ मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित समाज प्रबोधन पर कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री गायत्री दुर्गा मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी आयोजित विविध सामाजिक उपक्रमांतर्गत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य ऋषीपाल महाराज यांच्या समाज प्रबोधन पर कीर्तनाच्या कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते यामध्ये आ राजेश एकडे, ठाणेदार गणेश गिरी साहेब ,भाई अशांत वानखेडे ,सुहास चवरे, मनीष लाखानी, राजु पाटील, रमेश उमाळकर आणि इतर पत्रकार संघ तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गायत्री दुर्गा मंडळातील सर्व सदस्यांनी यंदाच्या वर्षी डिजे साऊंड व अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळून राबविण्यात आलेल्या विविध पारंपारिक स्पर्धा, आरोग्य शिबिर तसेच विद्यार्थ्यांसाठी घेतलेले अनेक शैक्षणिक उपक्रम याबद्दल कौतुक विशेष कौतुक केले. याप्रसंगी समाजम प्रबोधनपर किर्तनाला विविध सामाजिक संघटणेचे प्रतिनिधी, राजकीय पुढारी,पत्रकार, महिला, पुरूष, विद्यार्थ्यी व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी तथा माता महाकाली नगर वासियानी परिश्रम घेतले
विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मंडळ माता महाकाली नगर यांचा एक आगळा वेगळा उपक्रम … सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करा – ऋशिपाल महाराज
