मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या उभरत्या तलवारबाज खेळाडू गौरी बुडूकले हिने राष्ट्रीय स्तरावर मोठं यश संपादन करत बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. इंफाल (मणिपूर) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपली मोहोर उमटवली. गौरी ही जळगाव जामोद कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, ती आजवर जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर यश संपादन करत स्पर्धा गाजवत आली आहे. १ ऑगस्ट रोजी नागपूर कृषी महाविद्यालय येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. गौरीच्या या यशाबद्दल स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष डॉ. नितीन भुजबळ, सचिव विजय पळसकर, तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून तिचे कौतुक होत आहे.