चिखली – शहरातील स. द. म्हस्के रोड परिसरात एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख दुर्गाबाई जुलालसिंग राजपूत (वय ६५, रा. रामानंद नगर, चिखली) अशी झाली आहे.
दुर्गाबाई राजपूत या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी ४ एप्रिल रोजी चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, ६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता स. द. म्हस्के रोडवरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला; चिखलीत खळबळ
