Headlines

खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथे राजू भास्कर पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे यांचे मार्गदर्शन!

मुक्ताईनगर :- खडसे महाविद्यालयात दिनांक 24/09/ 2024 मंगळवार रोजी मानसशास्त्र विभाग व वाणिज्य विभागामार्फत सायबर क्राईम, सोशल मीडिया व व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख व्याख्याते म्हणून श्री राजू भास्कर( पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी टेलिग्राम, फेसबुक, व्हाट्सअप, वापर करताना सावधगिरीने वापर केले पाहिजे. सोशल मीडिया मार्फत अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात. त्या गुन्हा पासून आपण सावध राहायला पाहिजे आपले जर व्यक्तिमत्व विकास करून घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे. संधीचा उपयोग केला पाहिजे त्यांनी आपल्या मनोगतातून बालपणाची जीवनशैली कशी होते आणि आज तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध असून देखील आपण अभ्यासाकडे लक्ष देत नाही आपण स्वतःला विकसित करून घ्यायचे असेल तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या आणि जीवनात यशस्वी व्हा असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एच. ए. महाजन हे होते. यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांनो आपल्याला आई-वडील सगळ्या गोष्टी पुरवतात त्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात यशस्वी होणे गरजेचे आहे. शिक्षणात यशस्वी होऊन आपले व्यक्तिमत्व घडवा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख व समुपदेशक प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए .पी. पाटील तसेच प्रा. डॉ. गणेश चव्हाण( राज्यशास्त्र विभाग प्रमुख) डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे अधीक्षक पाटील े होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. एल. खडसे( वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्याने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *