Headlines

मन्यार जातीच्या सर्पाचा पाच वर्षाच्या चिमुकल्याला दंश,चिमुकल्याचा मृत्यू! इसरूळ येथील घटना

 

इसरुळ : घरात आईं वडिलांच्या सोबत अंथरूनावर झोपलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी इसरुळ येथे घडली.
शेख महेबूब शेख गफूर नेहमीप्रमाणे घरामध्ये खाली अंथरूण टाकून त्यांचा ५ वर्षीय मुलगा अल्तमास व ते एकाच गोधडीवर झोपलेले होते. साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांना त्यांच्या मुलाच्या रडण्याने जाग आली.त्यांनी उठून बघितले असता त्यांना अंथुरणावर साप दिसून आला.मुलाला सर्पाने दंश केला का म्हणुन त्यांनी बघितले
असता त्यांना दिसून आले नाही. दरम्यान सापास मारून सोबत घेऊन मुलाला उपचारासाठी चिखली येथे प्रथम डॉ. दळवी, डॉ. धनवे व नंतर योगीराज हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले परंतू साप खूपच विषारी असल्याने व सकाळचा वेळ असल्यामुळे त्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्या बालकाच्या दुर्दैवी असा अंत झाला.ह्या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *