मलकापूर – भारतीय जनता पक्षाने मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार चैनसुख संचेती यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. 26 ऑक्टोबरला ही घोषणा झाल्यानंतर, संचेती 27 ऑक्टोबर रोजी मुंबईवरून मलकापूर शहरात दाखल झाले. त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, उत्स्फूर्त स्वागत केले.
भाजपने यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मलकापूरचे नाव नसल्याने विविध तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आले होते. तिकीट कोणाला मिळणार, याबद्दल स्थानिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. तरुण व नवीन चेहऱ्याला संधी मिळेल अशी अपेक्षा असताना, भाजपने 26 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या यादीतून सातव्यांदा चैनसुख संचेती यांच्यावर विश्वास दाखवला.
मलकापूरमध्ये संचेती यांच्या उमेदवारीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या पुनरागमनाने आगामी निवडणुकीत भाजपची ताकद दाखवण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे.