मेरा बु : अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील एका विवाहितेची छेडछाड करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तक्रारीत नमूद आहे की पती घरी नसताना सासरे घरात येवून जाणून बुजून अश्लील भाषेत बोलतात. या त्रासा पायी सून व तीचे पती हे वेगळे भाड्याने खोली करून राहतात. तरी सुध्दा सासरे हे भाड्याचे घरी आले आणि घरात कोणीही नाही हे पाहून वाईट उद्देशाने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. सुनेचे दिर आणि जावू घरी आल्याने त्यांना सदरची हकीकत सांगितली. त्यामुळे लगेच सर्वांनी पोलीस स्टेशनला जावून तक्रार केली.
या तक्रारी वरून ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देढे यांनी आरोपी सासरा यांचेविरूध्द कलम ७४, ७८, (१) (i), २९६ बी. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.