Headlines

भविष्यात हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर :- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा इशारा

दिल्ली वृतसंस्था :मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज, २७ ऑक्टोबर रोजी एका पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, जर भविष्यात असा हल्ला झाला तर तो सहन केला जाणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल.एस. जयशंकर म्हणाले की, जेव्हा आपण झिरो टॉलरन्सबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की उत्तर निश्चित दिले जाईल. ते पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई हे फक्त भारतच नाही तर जगासाठी काऊंटर टेररिझमचे एक महत्वाचे प्रतिक आहे.
तसेच त्यांनी सांगितले की भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य असताना काऊंटर टेररिझम कमेटीची अध्यक्षता देखील भूषवली आहे. तसेच कमेटीची बैठक त्याच हॉटेलात आयोजित करण्यात आली होती ज्याच्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता.
परराष्ट्रमंत्री म्हणाले, “जेव्हा आपण झिरो टोलरन्स बद्दल बोलतो तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की जर कोणी काही करत असेल तर त्याला नक्कीच उत्तर दिले जाईल. हा भारत हे सहन करणार नाही. हेच बदलले आहे.पुढे बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, भारत जगभरात दहशतवादाविरोधी लढाईचे नेतृत्व करत आहे. कोणीतरी दिवसा व्यापर करावा आणि रात्री दहशतवादी कारवाया कराव्यात हे स्वीकारले जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *