खामगाव :- शहरातील दीपाली नगर परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १० मार्च रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मात्र, ती अद्याप घरी परतली नसून तिचा कुठेही थांगपत्ता लागत नाही.
कुटुंबीयांनी तिला नातेवाईक आणि ओळखीच्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.