मलकापूर :- अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने प्रवासी ऑटोला धडक दिली.ही घटना बुलढाणा मार्गावरील मुंधडा पेट्रोल पंपासमोर काल दि रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटोतील चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की ऑटो क्रमांक एम एच 28 टी 2804 हे वाहन मलकापूर वरून उमाळी येथे प्रवासी वाहतूक करत असताना बुलढाणा रोडवरील मुंधडा पेट्रोल पंपा समोर ऑटो आली असता सदर ऑटोला अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जबर धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की या अपघातात ऑटो पलटी होऊन चार जण गंभीर जखमी झाले.दरम्यान अज्ञात ट्रॅक्टर चालक तेथे न थांबता वाहन सुसाट पळवीत पसार झाला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहे