मलकापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे १४ वर्षाखालील तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा मुलांसाठी पार पडल्या. या स्पर्धेत विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूरचा क्रिकेट संघ तिन्ही सामने जिंकत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत संघाचे व शाळेचे नाव उंचावले. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक आकाश लटके तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.