Headlines

मलकापूर उपविभागीय कार्यालयचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर यांनी एन.एस.सी.योजने मार्फत केलेल्या महाघोटाळ्याची चौकशी करण्यात यावी – कुणाल सावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

मलकापूर, जि. बुलढाणा विभागीय कार्यालया अंतर्गत मलकापूर विभागातील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर यांनी २०१९ ते २०२३ पर्यंत गरजू व आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटाकापर्यंत विज वाहीनी पोहचविण्यासाठी नविन विज जोडणी योजना (न्यु सर्व्हस कनेक्शन स्किम) एन.एस.सी. ही योजना महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये गोरगरीबांच्या कल्याणासाठी आणली होती. त्यावेळेसचे मलकापूर येथील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता श्री. अनिल ए. शेगांवकर यांनी गरजू असलेल्या नविन विज ग्राहकांचे १.३% DDF या योजनेतून स्वतः पैसे खर्च करुन मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदारा जवळून विज वाहीनी जोडणी करुन अर्ज दिलेले होते. परंतु अनिल शेगांवकर यांनी शक्कल लढवून या नविन विज ग्राहकांकडून आलेले अर्ज ठेकेदाराशी संगनमत करुन एन.एस.सी. नविन विज जोडणी योजना (न्यु सर्व्हस कनेक्शन स्किम) मध्ये विज ग्राहकांकडून पूर्ण अंदाजपत्रकाचे ठेकेदार मार्फत रक्कम उकळून ही कामे केलेली आहेत. मलकापूर विभागात एकूण २९ नविन धनदांडग्या विज ग्राहकांची जोडणी झालेली असून या योजनेचा गोरगरीब आर्थीकदृष्ट्या असक्षम बेरोजगार घटकांना नविन व्यवसाय उद्योग सुरु करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा काडीमात्र उपयोग झालेला नाही. फक्त नविन विज जोडणीची कामे काही धनदांडगे व गर्भ श्रीमंताचे कामे करण्यात आलेली आहेत. या योजनेतून अल्पभूधारक, गरीब, दलीत, वंचीत ग्राहकांना कोणत्याच प्रकारे फायदा झालेला नाही. उलट १.३% DDF या योजनेतून नविन विज ग्राहकांना लाखो रुपयांचा फटका बसलेला आहे व ही रक्कम परस्पर अनिल ए. शेगांवकर व ठेकेदार यांच्या घशात गेली. एवढेच नव्हे तर एम.आय.डी.सी. मलकापूर-दसरखेड येथे ग्राहकांनी १.३% DDF चे अर्ज दिलेले होते. त्यांच्याकडून ५० ते ६० टक्के पैसे उकळून विज जोडणी दिल्या गेली. जवळपास ७ वर्षात अनिल शेगांवकर यांनी करोडे रुपयांचे घोटाळे करुन माया जमविलेली आहे व त्या जमविलेल्या मायेतून मलकापूर, जि. बुलढाणा, स्वतःचे गांव पारस, जि. अकोला गावात तसेच अकोला येथे जमीन जुमला, मकान त्याचे वडील, भाऊ, त्यांचे सासरे व इतर नातेवाईकांच्या नांवाने घेतलेले आहे. ते मलकापूर येथे कार्यरत असतांना त्यांनी कोणतेही विज ग्राहकाचे कामे विज ग्राहकांना त्रास देवून व त्यांना पैशांची मागणी करुनच केलेले आहे ते सर्व विज ग्राहक आजही अनिल शेगांवकरच्या नांवाने आरडाओरड करीत आहेत.मलकापूर येथून बाळापूर जि. अकोला येथे बदली झाल्यानंतर सुध्दा अनिल ए. शेगांवकर यांच्या कार्यशैलीत बदल झालेला नाही. कारण की, नियमानुसार बाळापूर येथे म.रा.वि.वि. कं.चे मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असतांना सुध्दा ते शासकीय वाहनाचा दुरुपयोग स्वतःचे घरगुती कामाकरिता अकोला येथे ये-जा (अप-डाऊन) करण्याकरिता करतात कारण सद्यःस्थितीत ते अकोला येथे वास्तव्यास आहेत व बाळापूर येथे म.रा.वि.वि.क. चे मुख्यालयी ते वास्तव्यास नाही. बाळापूर शहराचा इतिहास बधता बाळापूर हे अतिशय संवेदनशिल शहर म्हणून ओळखले जाते. भूतो ना भविष्य रात्रीच्या वेळेस जर बाळापूर शहरात म.रा.वि.वि.कें. संबंधीत जर काही अनुचित घटना घडली तर या घटनेस जबाबदार कोण? अशी ओरड बाळापूर शहराच्या सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.विशेष म्हणजे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर मलकापूर येथे कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा साला दिपक दौलत झनके याला महावितरणाचे बील प्रिंट करण्याचा ठेका त्यांच्या कार्यकाळात दिलेला आहे हे माहितीच्या अधिकारात उघड झालेले आहे.तरी या महाघोटाळेबाजाची महाघोटाळ्याची उच्च स्तरीय निष्पक्षपणे चौकशी व्हावी व ही योजना गरजू गोरगरीब लोकांपर्यंत पोहचवून नविन विज ग्राहकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. या अगोदर सुध्दा एन.एस.सी. घोटाळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थातूर मातूर चौकशी करुन चिरीमीरी घेवून सदर प्रकरणावर पडदा टाकलेला आहे. तरी मुंबई मुख्यालयातून आपल्या दूतामार्फत वरील प्रकरणाची १ महिन्याच्या आत चौकशी करुन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी ही विनंती. अन्यथा नाईलाजास्तव मला लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल होणाऱ्या परिणामास संबंधीत अधिकारी, शासन, प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी. अशी मागणी कुणाल सावळे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *