नागपूर- कुही ता :- दिवंगत आयु. सदाशिव सोमाजी बारसागडे यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपंचायत कुही अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, सदाशिव बारसागडे यांची पत्नी श्रीमती मैनाबाई बारसागडे आणि पुत्र आयु. मनोज सदाशिवजी बारसागडे यांच्या वतीने ही सामाजिक उपक्रमपर मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ. हर्षा इंदुलकर, उपाध्यक्ष अमितजी ठवकर, डॉ. शिवाजी सोनसरे, पत्रकार निखिल खराबे, पत्रकार प्रदीप घुमडवार, तसेच नगरपंचायत कुहीचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात दिवंगत बारसागडे यांना आदरांजली वाहून पुण्यानुमोदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत, या उपक्रमाचे कौतुक केले.
कुहीत दिवंगत सदाशिव बारसागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप
