नांदुरा:- शेलगाव मुकुंद ते कोलासर रोडवर झालेल्या अपघातात जिगाव येथील अविनाश रमेश तायडे (वय २३) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.१६ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर अविनाश याला नातेवाईकांनी तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी डॉक्टर जयमाला राजपूत यांच्या सूचनेनुसार कक्षसेवक किशोर अजवसांडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्या आधारे नांदुरा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ कलमानुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चिखलकर करीत आहेत.