मलकापूर :- ३० ऑक्टोबर, बुधवारी, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भाडगणी येथील २७ वर्षीय संदीप जयवंत खोडके याचा शेतात काम करत असताना रोटाव्हेटरमध्ये अडकून मृत्यू झाला.
संदीप हा एक एकर शेती करीत होता, आणि त्याच्यावर कर्जाचे मोठे ओझे होते. पावसामुळे शेतीची स्थिती गंभीर झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना कामगार मिळवणेही कठीण झाले. संदीप शेतात काम करत असताना मध्ये रोटाव्हेटरमध्ये अडकला त्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला त्याचा मोठा भाऊ गजानन खोडके संदीपला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ उपजिल्हा रुग्णालयात आले आणि त्यांनी परिवाराला सहकार्य केले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.