Headlines

श्री संत नरहरी महाराज प्रवेशद्वार मार्गाचा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न; माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या हस्ते उद्घाटन; माळवी सोनार समाजाचा उपक्रम

मलकापूर (दिपक इटणारे): दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शहरातील बुलढाणा रोड परिसरात धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. महेश अर्बन पतसंस्था नजीक उभारण्यात आलेल्या “श्री संत नरहरी महाराज प्रवेशद्वार मार्ग” या मार्गाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन माळवी सोनार समाजाच्या वतीने करण्यात आले. हा सोहळा दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत माळवी सोनार समाजाचे अध्यक्ष सुभाष ठोसर, मेजर नामदेवराव पाटील, अनिल गांधी, आदित्य रावळ आणि विनय काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे वातावरण धार्मिक आणि आनंदमय झाले होते. समाजातील ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या सोहळ्याला प्रभाकर रत्नपारखी, भानुदास बुडकले, रमेश मावळे, गजानन ठोसर, मनोहर रत्नपारखी, रवींद्र रत्नपारखी, प्रदीप शुरपाटणे, पुरुषोत्तम उंबरकार, वसंत कोंदनकर, अनिल मुंधोकार, विनोद रत्नपारखी, सुरेश ठोसर, रवींद्र उंबरकर, मधुकर रत्नपारखी, दिगंबर अनासुने, प्रवीण ठोसर, राजेश ठोसर, संजय ठोसर, अलकाताई सुभाष ठोसर, गीताताई वसंत कोंदनकर, सुवर्णाबाई राजेश महाले, संजय उंबरकर, विलास तळेकर, दीपक इटणारे, प्रमोद उज्जैकार, बळीराम बावस्कर, अशोक उज्जैकार, संदीप ठोसर, योगेश बावस्कर, अमोल बगाडे, चत्तरसिंग राजपुत, उखर्डा तांदूळकर, शुभम ठोसर, सतीश ठोसर यांसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते. या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने समाजात एकात्मता, श्रद्धा आणि संत परंपरेबद्दल आदरभाव दृढ करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!