खामगाव : पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवण्याची घटना शनिवारी घडली. राजेश जगन्नाथ धनोकार ( वय ४५ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेश धनोकार या शेतकऱ्याची पळशी शिवारात शेती आहे. या शेतीचे अतिपावसामुळे नुकसान झाले, त्यामुळे हा शेतकरी सतत चिंताग्रस्त राहत होता. अशातच शनिवारी या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे धनोकार परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याप्रकरणी अनंता जगन्नाथ धनौकार (४२, रा. पळशी) ह.मू. चांदे कॉलनी यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पावसामुळे शेतीचे नुकसान, चिंताग्रस्त शेतकऱ्याने गळफास घेत संपवली जीवन यात्रा!
