मलकापूर ( दिपक इटणारे ):- काँग्रेस पक्ष हा फक्त राजकारण करणारा नव्हे तर समाजकारण घडवणारा पक्ष आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आशीर्वादातून आणि युवकांच्या ऊर्जेतूनच पक्ष पुन्हा बळकट होईल. आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मला मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच अग्रणी राहणार आहे. अन्याय, भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरोधात काँग्रेसची झुंज सातत्याने सुरू राहील. युवक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांसाठी लढणे हेच माझे ध्येय आहे. मलकापूरमध्ये परिवर्तन घडवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष समर्थपणे पार पाडेल.”
युवा काँग्रेस नेते कपील राठी यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर शहरात एक भव्य आणि आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पहिल्यांदाच शहर काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांची अनोखी सांगड घालण्यात आली. या सोहळ्यामुळे मलकापूर शहरात उत्सवाचेच वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजेश एकडे, डॉ. अरविंद कोलते व हरीष रावळ होते. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये हाजी रशीद खा जमादार, डॉ. सै. महेबुब, श्यामकुमार जी राठी, प्रमोद दादा अवसरमोल, दत्ताजी हिवाळे, अताउ रेहमान जमादार, संभाजी शिर्के, युसुफ खान, डॉ. सलीम, अनिल जैस्वाल, अनिल खर्चे, रईस खा जमादार, अनिल भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांच्या जुन्या छायाचित्रांची आकर्षक प्रदर्शनी भरवून पक्षाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. काँग्रेसच्या ७० वर्षांवरील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा फेटा व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर मलकापूर शहर काँग्रेस कमिटीतील नव-नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप करून संघटनेला बळ देण्यात आले. विशेष म्हणजे रात्री ९.१५ वाजता शहरभरात एकाच वेळी रंगीबेरंगी फॅन्सी आतषबाजी फोडण्यात आली. हा अनोखा उपक्रम मलकापूर शहरात प्रथमच राबविण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल मुंदोकार, फिरोज खान, जावेद कुरेशी, साजिद खान, विनय काळे, राजेश उखर्डे, राजीक शेख, सिद्धांत इंगळे, नाजीम नवाज, राम राखुंडे, एजाज शहा, शकील पठाण, माजिद ठेकेदार, सय्यद अजिज, प्रशांत इंगळे, अजिज बागवान, अजीम कुरेशी, एस. पी. संभारे, रवींद्र भोलनकर, दिलीप आढाव, ईश्वर भदाले, शोएब लाला, अश्रफ खान, शेर खान, किसन पाटील, ज्ञानदेव तायडे, कैलास थाटे, अर्जुन थाटे, विनोद तायडे, वाजिद खान, सलीम एम. एस., जावेद ठेकेदार, गोपाल तांदूळे, शाम तायडे, रमेश राजपूत आदींनी परिश्रम घेतले.
नागरिकांचे प्रेमच माझा खरा सन्मान, मलकापूरच्या नागरिकांच्या प्रेमानेच माझी लोकसेवेची ताकद वाढली – कपिल राठी
