नांदुरा : – तालुक्यातील निमगाव येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना ३ एप्रिल रोजी उघडकीस आली. तक्रारदार राजाराम सुगदेव उगले हे संपूर्ण कुटुंबासह पंढरपूर व तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातून २५ हजार रुपये रोख रक्कम, तसेच सोन्याच्या अंगठ्या, मणी, डोरले आणि पोत असा मिळून ८८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
संपूर्ण कुटुंब देवदर्शनासाठी गावाला गेले, इकडे चोरट्यांनी घर साफ केले; नांदुरा तालुक्यातील निमगाव ची घटना!
