Headlines

आत्महत्या नव्हे तर हत्या; मयुरी ठोसर प्रकरणी मुक्ताईनगर सोनार समाजाची निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर : लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच सासरी छळाला कंटाळून मयुरी गौरव ठोसर हिने जीव देण्याची वेळ आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत समस्त सोनार समाज, मुक्ताईनगर यांनी तहसिलदारांना निवेदन देत संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दि.10 सप्टेंबर रोजी जळगांव जिल्ह्यातील सुंदर मोतीनगर येथे ही धक्कादायक घटना घडली होती. 23 वर्षीय मयुरी ठोसर ही उच्चशिक्षित तरुणी सततच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळली. या घटनेमुळे समाजमन संतप्त झाले आहे.
सदर प्रकरणी काही आरोपींना अटक झाली असली तरी पती गौरव ठोसर, जेठ गणेश किशोर ठोसर, सासरा किशोर ठोसर, सासु लता किशोर ठोसर या सर्व सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली. तसेच, तक्रार नोंदविण्यात टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
हुंडा प्रथा व स्त्रियावरील छळ हा समाजासाठी कलंक असून अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी समाज बांधवांनी तहसिलदारांना सादर केलेल्या निवेदनात केली. निवेदनावर शेकडो सोनार समाजाच्या महिला व पुरुषांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!