Headlines

मलकापुरात, उत्साहापूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला दिला निरोप

मलकापूर( दिपक इटणारे ):- ढोल ताशांच्या निनादात, आकर्षक सजावट केलेले गणपती बाप्पांचे रथ, गुलाबाच्या फुलांची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मलकापूरकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. शहरात मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून सर्वत्र गणरायाला निरोप देण्याची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार घडू नये व गावचे वातावरण भंग होणार नाही या दृष्टीने मलकापुरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.  मलकापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहरात उत्तम नियोजनामुळे गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पाडला.
     मलकापुरात मुख्य विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजेपासून सुरू झाली. मलकापूर शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. बस स्टँड चौक, सत्यम चौक, हनुमान चौक, गांधी चौक, अशा सर्व चौकांमध्ये गणपती बाप्पांचे रथ सजलेले होते. या रथाला पाहण्यासाठी तसेच ढोल ताशांचा निनाद व लेझीम मंडळांचा लेझीम बघण्यासाठी मलकापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. या लेझीम मंडळामध्ये माता महाकाली लेझीम मंडळ, मंगळगेट लेझीम मंडळ, गाडेगाव लेझीम पथकाने मलकापूरकरांचे लक्ष वेधून धरले होते. ढोल ताशा लेझीम पारंपारिक वाद्य पथकामुळे सर्व मलकापूर परिसर दणाणून गेले होते. यामध्ये मलकापूर शहरांमधून 27 मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
     मलकापूर पोलिसांकडून करण्यात आलेले उत्तम नियोजन तगडा बंदोबस्त आणि मलकापूरकरांनी सूचनांचे केलेले पालन यामुळे दहा दिवसांच्या गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक उत्साही आनंद वातावरणात आणि शांतता पार पाडली.
     विसर्जन मिरवणुकीसाठी माता महाकाली चौक, सत्यम चौक, हनुमान चौक, नसवाल चौक, व इतर रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात होते. यामध्ये पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी, एस आर पी सेक्शन, आर सी पी सेक्शन कर्मचारी, होमगार्, बाहेरील ट्रेनिंग सेंटर चे अधिकारी कर्मचारी असे एकूण 175 अधिकारी व कर्मचारी होते तसेच गणेश मंडळांवरती निगराणी ठेवण्यासाठी 2 ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे असा तगडा बंदोबस्त होता. पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी तसेच गणेश मंडळांना भेट देऊन आढावा घेतला. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांचे योग्य नियोजन आणि तगडा बंदोबस्त ठेवल्याने कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मात्र डी.बी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दमदाटी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. तर काही  ठराविक मंडळामध्ये पारंपरिक वाद्यवर लेझीम सुरू असतांना मध्येच येऊन लेझीम बंद करण्याचा अट्टहास धरला होता. डी.बी. पथकातील काही कर्मचाऱ्यांचा दमदाटी करण्याचा वाद हा सार्वजनीक उत्सवात नित्याचाच झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *