मलकापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी-२०२४ परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात कोलते पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
जाहीर झालेल्या निकलामध्ये कॉम्पुटर इंजीनिअरिंग शाखे मधील पहिल्या वर्षांतील आरती राजेश जैस्वाल हिने ८८.२९ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर श्रुती गजानन चोपडे ८४.८८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर पूर्वा राजेंद्र सरोदे यांनी ८३.११ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. दुसऱ्या वर्षातील वैष्णवी सुरेश बडगुजर हिने ८७.२० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवीला तर दर्शन राजाभाऊ ठोसर ८७.०७ टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला व कोमल रमाकांत राणे ८६.२२ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आहे. तृतीय वर्षातील मोहम्मद सरीम अब्दुल याने ८५.७८ टक्के घेऊन प्रथम तर रोहिणी प्रवीण पाटील ८३.८८ टक्के घेऊन द्वितीय तर मोहम्मद सलमान याने ८३.०६ टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
मेकॅनिकल इंजीनिअरिंग शाखे मधील पहिल्या वर्षांतील गणेश अनिल पाटील याने ७९.५२ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर वेदांत संदीप वानखडे याने ७४.८८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला व प्रणव समाधान वाढे ७३.४९ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. दुसऱ्या वर्षातील ऋषिकेश अरुण जामोदे याने ८४.८७ टक्के प्राप्त करून प्रथम, वैष्णवी मनोहर चरखे हिने ७७.५१ टक्के प्राप्त करून द्वितीय व वसुंधरा वीरेंद्रसिंह राजपूत हिने ७६.३५ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तृतीय वर्षातील तुषार संजय पाटील याने ८१.४४ टक्के घेऊन प्रथम तर राज भरत इंगळे ७९.९० टक्के घेऊन द्वितीय तर दीपक रमेश कन्हेरकर ७७.२० टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
इलेट्रीकल इंजीनिअरिंग शाखे मधील पहिल्या वर्षांतील अमृता झनके हिने ७८.४७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर भाग्यश्री राजपूत हिने ७२.१२ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय व पायल सोळंके ७१.६० टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. दुसऱ्या वर्षातील सर्वेश्वर संजय वावगे याने ८१.६० टक्के घेऊन प्रथम तर रामकृष्ण सुनील मुन्डोकार ८१.४७ टक्के घेऊन द्वितीय तर गौरव भरत अढाव ७७.८७ टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. तृतीय वर्षातील श्रेयस सुनील किनगे याने ८९.३८ टक्के घेऊन प्रथम तर जितेंद्र प्रकाश वंजारी ८०.०० टक्के घेऊन द्वितीय तर प्रणव संजय बकाल याने ७९.३८ टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सिव्हील इंजीनिअरिंग शाखे मधील पहिल्या वर्षांतील प्रतिक राजधन धुंदाळे याने८१.०६ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर स्नेहल चंद्रकांत गलवाडे हिने ७८.४१ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय व रोशन संजय भारंबे याने ७६.४७ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी.एन.पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे सह महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, पॉलिटेक्निक इन्चार्ज प्रा. संदीप खाचणे, विभागप्रमुख प्रा. महेश शास्त्री, प्रा. साकेत पाटील, प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा. पराग चोपडे यांनी सर्व गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे