मलकापूर ( दिपक इटणारे ): मलकापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले असताना, काँग्रेस पक्षात नव्या नेतृत्वाच्या शोधाला गती मिळाली आहे. या शर्यतीत सौ. इंजिनिअर चेतनाताई गिरीराज राठी यांचे नाव शहरात सर्वाधिक चर्चेत आले असून, त्या काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुढे येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
चेतनाताई राठी या माजी सैनिक दिनकर मोतीराम बोंबटकार (माळी) यांच्या कन्या असून, माजी नगराध्यक्ष शामभाऊ गोकुळदास राठी यांच्या सून आहेत. देशसेवेत वडिलांनी तब्बल १९८३ ते २०१८ या काळात ३५ वर्षे निस्वार्थ सेवा बजावली, तर श्यामभाऊ राठी यांनी काँग्रेस पक्षाशी ३५ वर्षांपासून एकनिष्ठ राहून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. शामभाऊ राठी यांची “सर्वांना सोबत घेऊन चालण्याची” वृत्ती, सर्व जाती-धर्मातील लोकांशी असलेले स्नेहसंबंध आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळेच राठी कुटुंबाचे मलकापूर शहरात एक वेगळे स्थान आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचा थेट लाभ चेतनाताई राठी यांना होत असल्याचे नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की, “माजी सैनिकांची कन्या आणि अभियंता असलेली सुशिक्षित महिला नेत्री” म्हणून चेतनाताई राठी शहराच्या विकासाला एक नवा अध्याय देतील. त्यांच्या तांत्रिक पार्श्वभूमीमुळे पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शहर सौंदर्यीकरण या विषयांवर दीर्घकालीन नियोजन होऊ शकेल, अशी अपेक्षा जनतेत आहे. काँग्रेस पक्षात नगराध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज इच्छुक असले तरी, श्यामभाऊ राठी यांच्या निष्ठेचा, सातत्यपूर्ण कार्याचा आणि जनतेतील विश्वासाचा लाभ चेतनाताई राठी यांना मिळणार यात संशय नाही. विशेष म्हणजे, महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या पक्षाच्या भूमिकेशीही त्यांची निवड सुसंगत ठरेल, असे मत स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, महिला संघटना आणि युवकांनी सोशल मीडियावरही चेतनाताई राठी यांच्या नावाच्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांचे विनम्र, संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व यामुळे शहरात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
शहरात अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे की, “काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब होणार असल्यास, चेतनाताई राठी हे सर्वात योग्य आणि लोकप्रिय नाव ठरेल.” त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
