मलकापूर येथील रहिवाशी असलेले वीरसिंहदादा राजपूत गेल्या 20 वर्षानपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून पत्रकारिता करत असताना सामाजिक कार्य देखील हे करत आहे. वीरसिंहदादा राजपूत यांनी मागच्या पंचवार्षिक ला नगरपरिषददेची निवडणूक सुद्धा लढवली होती. त्याचबरोबर 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. वीरसिंहदादा राजपूत यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योजक, यांच्यासह सामान्य माणसांशी त्यांचा जन संपर्क मोठ्या प्रमाणात असून सामान्य गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी ते आपल्या लेखणीतून आजही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दीनदुबळ्यांचे वाली’ गोरगरिबांचे कैवारी’ अशी त्यांची ओळख असून पत्रकारांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी वीरसिंहदादा राजपूत यांनी अनेक आंदोलने केली आहे हे विशेष.. त्यांच्या बरोबर मतदार संघात त्यांचा चांगला संपर्क असल्याने सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत त्यांचे चागले संबंध आहेत. त्याचबरोबर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव वीरसिंहदादा यांच्यावर असल्याने त्यांची यासोबतच वारकरी संप्रदायाशी एक अशी घट्ट नाळ जोडलेली आहे. माता महाकाली भजनी मंडळाच्या माध्यमातून मलकापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागांमध्ये आपल्या वाणीतील भजनांमुळे दादांनी एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.
त्याचबरोबर मलकापूर विधानसभा मतदार संघातील जनतेचा उमेदवार म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून भेटी गाठी सुद्धा सुरू केल्या आहे. एक प्रामाणिक आणि निष्कलंक चेहरा या विधानसभा निवडणुकीत उतरणार हे नकी..