देऊळगाव राजा :- शहरातील समतानगर भागात पैशाच्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून देऊळगाव राजा पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार आकाश खंदारे याच्याकडे सोयाबीन विक्रीसंबंधी इसाराचे काही पैसे देणे-घेणे प्रलंबित होते. याच कारणावरून वाद निर्माण झाला. वादाच्या भरात समाधान मोरे या आरोपीने विळ्याने आकाश खंदारेच्या उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत समाधान मोरेसोबत निमा, अणु आणि गोपाल या तिघांनीही सहभागी होत पीडितावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी विशाल घुले यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी समाधान मोरे, निमा, अणु आणि गोपाल या चौघांविरुद्ध भादंवि कलमानुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नायबराव मोगल हे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
पैशाच्या वादातून युवकावर विळ्याने हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल! देऊळगाव राजा येथील घटना
