Headlines

कर्जबाजारीपणाचा मानसिक ताण सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!

देऊळगाव राजा : – कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या मेहुना राजा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर श्यामराव डोंगरे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किशोर डोंगरे यांनी शेतीसाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. याशिवाय दोन मुलींच्या लग्नाचा मोठा आर्थिक खर्च आणि नियमित बँक हप्त्यांचा ताण त्यांच्या डोक्यावर होता. अवघ्या…

Read More

रस्ता खचल्याने दुर्दैवी अपघात; तीन भावंडांपैकी एकाचा मृत्यू, देऊळगावराजा तालुक्यातील घटना

देऊळगावराजा (खल्याळ): गव्हाण शिवारात रस्ता खचून तीन सख्खे भाऊ मलब्याखाली अडकण्याची दुर्दैवी घटना २५ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत दोन भावांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र एका भावाचा मृत्यू झाला.डोलखेड येथील डोईफोडे कुटुंबातील बद्री (४०), संदीप (३८), आणि दिलीप (३२) हे तीन भाऊ खल्याळ गव्हाण ते सिनगाव जहागीर रस्त्यावर शेतसिंचनासाठी पाईपलाईनच्या लिकेजमध्ये छडी टाकण्याचे काम…

Read More

दिव्यांग युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, देऊळगाव राजा येथील घटना!

  देऊळगाव राजा : शिवाजीनगर परिसरातील २२ वर्षीय दिव्यांग युवक संदीप साबळे याने वैफल्यग्रस्त अवस्थेत स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. संदीपने घरात कोणी नसताना गळफास घेतला. त्याची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी अपघातामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते, त्यामुळे तो सतत…

Read More

भरधाव ट्रॅक्टरची धडक; १४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

देऊळगावराजा: तालुक्यातील सिनगाव जहाँगीर-गारगुंडी रोडवरील पुलाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. राजू अनील पवार (वय १४, रा. मेहुणाराजा) हा स्प्लेंडर प्लस या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून सिनगाव जहाँगीर येथून मेहुणाराजा गावाकडे जात असताना ट्रॅक्टरने भरधाव व निष्काळजीपणे चालवून…

Read More

चिखली बायपास वरील कुंभारी शिवारात आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह; खून झाला असल्याचा संशय!

  देऊळगावराजा: चिखली बायपास कुंभारी शिवारातील एका कट्ट्याजवळ एका पुरुषाच्या प्रेताचा शोध लागला आहे. प्राथमिक तपासानुसार, मृतदेहावर गळा आवळण्याच्या इजा दिसून येत आहे, ज्यामुळे खून झाल्याचे आढळते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे वय ३५ ते ४० वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. खून की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही,…

Read More

स्कीम लागल्याचा बहाना.. घरातील दागिन्यावर होता निशाणा, महिलेची २ लाखाने फसवणूक!

  देऊळगाव राजा :- शहरातील विठाई नगर येथील महिला रमेश काबुकडे वय ५६ वर्ष या राहत्या घरी असताना एका अनोळखी इसमाने तुम्हाला स्कीम लागली घरातील दागिने दाखविण्यास सांगितले व महिलेस गाडीवर घेऊन जाऊन सातेफळ रोडवर नेऊन सोडले व परत फिर्यादीच्या घरी जाऊन पेटीत ठेवलेल्या थैलीतील दागिने अंदाजे किंमत दोन लाख ४४ हजार ७५० रुपये घेऊन…

Read More

ताराचा स्पर्श झाल्याने गणेश भक्ताचा मृत्यू, मंडप काढत असतांना घडली घटना

देऊळगाव राजा :- छत्रपती शासन गणेश मंडळाच्या पेंडॉलवरील ताडपत्री (मंडप) काढत असताना वरून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. पप्पू लाड असे मृत युवकाचे नाव आहे. शहरातील कोंडवाडा चौकात छत्रपती शासन गणेश मंडळाची यावर्षी प्रथमच स्थापना करण्यात आली होती. श्री गणपती विसर्जनानंतर टिनपत्रे व ताडपत्री काढण्यासाठी…

Read More

कोर्टातील केस मागे घेण्यावरून महिलेस मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल! देऊळगाव राजा येथील घटना

( वृत्तसेवा ) देऊळगाव राजाः शहरातील रहमत नगर येथील फिर्यादी महिलेला घटस्फोटासाठी कोर्टात केलेली केस मागे घ्यावी, या कारणावरून गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी शहरात घडली, या कारणी ८ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पो. स्टेशनमधून मिळालेल्या, माहितीनुसार आरोपीशी रहमत नगर येथील फीर्यादीचा विवाह झालेला असून त्यांच्यामध्ये…

Read More

थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यास मारहाण, पिता-पुत्रावर गुन्हा

  देऊळगावराजा :- थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला मारहाण करण्यात आली ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दत्तनगरमध्ये घडली. देऊळगावराजा येथील महावितरण कंपनीचे सहायक अभियंता रवींद्र किटे व त्यांचे सहकारी दत्तनगरमध्ये थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेले होते. तेथे रामेश्वर पवार व त्यांच्या मोठ्या मुलाने वीज जोडणी खंडित केल्याचा राग…

Read More
error: Content is protected !!