
कामावर जातो सांगून घरी परतलेच नाही, दुसऱ्या दिवशी पैनगंगा नदीत सापडला मृतदेह; डोणगाव येथील घटना!
डोणगाव :- अंत्री देशमुख येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा पैनगंगा नदीपात्रात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल विष्णू मोरे (वय ४२, रा. अंत्री देशमुख) हे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी घराबाहेर पडले होते. दररोजप्रमाणे ते मेहकर येथे कामावर जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून गेले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला…