
डासाळा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज
उदयनगर : – येथून काही अंतरावर असलेल्या डासाळा येथे ३८ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३० एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, डासाळा येथील योगेश गणेश मते (वय ३८ वर्षे) यांनी आपल्या शेतात जाऊन नायलॉन दोरीच्या साह्याने टिन शेडवरील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके…